E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुण्यात राष्ट्रवादीचे दोन शहराध्यक्ष
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
पूर्व भागात टिंगरे, तर पश्चिम भागात जगताप कार्य करणार
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे शहरात दोन स्वतंत्र शहराध्यक्षाची नियुक्त केली आहे. पुणे (पूर्व) शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक सुभाष जगताप तर पुणे (पश्चिम) शहराध्यक्षपदी आमदार सुनील टिंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने औपचारिक घोषणा करत या नावांवर शिक्का मोर्तब केला आहे.
दीपक मानकर यांच्या राजीनाम्यानंतर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक धोरणात मोठे बदल होणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. पुढील नेतृत्व कोणाकडे जाईल यावर अनेक तर्क-वितर्क सुरू होते. यामध्ये आमदार सुनील टिंगरे आणि माजी महापौर दत्ता धनकवडे यांची नावे आघाडीवर होती. मात्र, पक्षाने एकत्रित नेतृत्वाऐवजी विभागीय नेतृत्वाची रणनीती स्वीकारत दोघांची स्वतंत्रपणे नियुक्ती केली आहे.
सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम पुण्यातील प्रभावी नेते असून सध्या ते वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. २०१९ मध्ये त्यांनी भाजपचे उमेदवार जगदीश मुळीक यांचा पराभव करुन विधानसभा निवडणूक जिंकली होती. टिंगरे यांची ओळख जमीनीवर पाय असणारे, सर्वसामान्यांशी थेट संपर्कात राहणारे आणि मतदारसंघात सक्रिय असलेले नेते म्हणून आहे. पक्ष संघटन, स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका आणि जनसंपर्क या बाबतीत त्यांचा ठसा उमटलेला आहे.
सुभाष जगताप हे पुणे शहरातील अनुभवी नगरसेवक असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अनेक वर्षे पुणे महानगरपालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. पूर्व पुण्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांवर त्यांनी सातत्याने भूमिका घेतली आहे. पक्षासाठी निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे जगताप यांनी पूर्वीही संघटनात्मक जबाबदार्या समर्थपणे पार पाडल्या आहेत. त्यांनी मतदारसंघातील संपर्क, पक्षवाढ आणि स्थानिक प्रश्नांवरील लढ्यामुळे आपली छाप सोडली आहे. सुभाष जगताप यांच्याकडे कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी आणि हडपसर हे विधानसभा मतदारसंघ असणार आहे.
Related
Articles
प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा
11 Jun 2025
जयप्रकाशचे डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
15 Jun 2025
शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी सरपंच व ग्रामपंचायतीने लक्ष घालावे : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
काही क्षणांत होत्याचे नव्हते...(अग्रलेख)
14 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
विमान अपघातातील दृश्ये भयानक : स्टॉर्मर
13 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक